.

ll हरि ॐ ll

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे.
तुम्ही माझ्या "स्वातंत्र्यसमर १८५७ चा" या ब्लागला भेट दिल्याबद्द्ल धन्यवाद.

Friday, October 1, 2010

१० मे २००७

१० मे २००७ . स्वतंत्र भारत देशात श्वास घेणार्‍या आपल्या जनतेपैकी फ़ार कमी लोकांना हे ठाऊक असेल की आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्याचा पाया दीडशे वर्शांपूर्वी या दिवशी घातला गेला . “शिपायांचे बंड” म्हणून इंग्रजांनी हेटाळलेल्या , पण पुढे “हिंदुस्थानचे पहिले स्वातंत्र्यसमर” म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गौरविलेल्या एका लढ्याची रणदुंदुभी मेरठ येथे याच दिवशी फ़ुंकली गेली . मंगल पांडे नावाच्या ठिणगीने उठलेल्या या आगीने पाहता पाहता वणव्याचे रूप धारण केले आणि इंग्रजी राज्य भस्मसात होऊन जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती . ही आग शमवण्यात इंग्रजांना यश आलं असलं तरी याच आगीतून पुढे क्रांतीचे निखारे फ़ुलले . झाशीची रणचंडी राणी लक्ष्मीबाई , श्रीमंत नानासाहेब पेशवे , बहादूरशहा जफ़र, अवधची बेगम हजरतमल , कुंवरसिंग, रंगो बापूजी आणि सेनापती तात्या टोपे अशी अनेक तेजस्वी ज्वाळा या वणव्यातून उठल्या आणि पुढे अनेक अनाम वीरांनादेशकार्यासाठी प्रेरणास्त्रोत बनून गेल्या .


केवळ अपयशी ठरला म्हणून या उठावाचे महत्त्व कमी होत नाही . हिंदु मुस्लिम ऐक्याचे आगळे दर्शन या निमित्ताने घडले . दुर्दैवाने आपण ते टिकवू शकलो नाही . आज या घटकेला त्याची निकडीची गरज निर्माण झाली आहे . या लढ्याची आणि त्यातल्या लढवय्यांची जेवढी दखल खुद्द इंग्रजांनी घेतली , तितकी आपल्याला कधी घ्यावीशी वाटली नाही . याचा अर्थ आपण या वीरांना विसरलेलो आहोत असा नाही . स्मारकं उभारून आणि चौक, रस्ते इत्यादींना नावे देऊन त्यांची स्मृती केवळ कागदावरच किंवा भाषणापुरतीच कशी राहिल याची पुरेपुर काळजी सत्ताधार्‍यांनी घेतलेली आहे . म्हणूनच राणी लक्ष्मीचे गोडवे गाणार्‍या समाजात स्त्री भ्रूणहत्या सर्रास घडताना दिसतात . “पुराणातली वांगी पुराणात” तद्वत “इतिहासातली वांगी इतिहासात” असंच चित्रदिसतं . शिवाजी आणि लक्ष्मी जरूर जन्मावेत पण शेजारी अशी आपली मनोवृत्ती झालेली आहे . या पार्श्वभूमीवर १८५७ च्या वीरांचे स्मरण न करणे हा करंटेपणा ठरेल . हा उठाव चेतवला तो कुणा राजा रजवाड्याने नव्हे , तर मंगल पांडे , एका साध्या शिपायाने . थोडक्यात सामान्यातूनच अशा असामान्य पर्वाचा आरंभ होतो हे वास्तवनक्कीच प्रेरणादायी आहे .

या स्वातंत्र्ययुद्धातला एक काळजाला चटका लावणारा पण तितकाच बाणेदार प्रसंग असा…

या स्वातंत्र्ययुद्धातला चिरडण्यात ब्रिटिशांना यश आल्यावर कैदेत असलेल्या शेवटच्या बादशहाला, बहादूरशहा जफ़रला त्याचे हुजरे कुचेष्टेने एक तबक पेश करतात . त्यावरचे मखमली आच्छादन बाजूला केल्यावर बादशहाला आपल्या दोन पुत्रांची मस्तके दिसतात . हुजरे जफ़रला म्हणतात की हिंदुस्थानची तलवार आता शांत झाली आहे . त्यावर त्या बहादूरशहाने त्या प्रसगातही धीरोदात्तप असे उद्गार काढले की ,

“वादीयों मे लू रहेगी जब तलक ईमान की

दिल्ली क्या लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की..!”


आज वादीयां तशाच आहेत , तेग सुद्धा आहे . पण देशाभिमानची झुळुक वाहत नाही ही आमची शोकांतिका..!


“जय हिंद”

4 comments:

 1. नमस्कार, आपला ब्लॉग मराठी ब्लॉग जगतशी जोडला गेलेला आहे. म. ब्लॉ.ज.ला भेट देणार्‍या वाचकांना आपल्या ब्लॉगची माहिती देण्यासाठी म.ब्लॉ.ज.चे ओळखचिन्ह आपल्या ब्लॉगवर अवश्य लावा. म.ब्लॉ.ज.च्या फेसबुक पेजला व ट्विटर पेजला देखील अवश्य भेट द्या.

  ReplyDelete
 2. there was a revolt in 1842 in Bundelkhand. The Bundela Kings, Knights, farmers, Monks, Common people came together and revolted against British Rule. They hanged 5 British officers. They killed several British and made them to flew from Bundelkhand.

  ReplyDelete
 3. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 4. Ratnagiri Property is great place for meditation, eco living and cultural place, it's best tourism place must visit yearly.. i found many informative info from this post and blog

  ReplyDelete

साल २००७-०८ एक मह्त्वपुर्ण वर्ष,
१८५७ च्या स्वतंत्रता संग्रामास १५० वर्षे पुर्ण.
महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहास १०० वर्षे पुर्ण.
भारताच्या स्वतंत्र्याला ६० वर्षे पुर्ण.
संपुर्ण देशभर एकाच वेळी स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकायचे व इंग्रज सत्ता समुळ नष्ट करुन स्वराज्याची प्रस्थापना करायची या हेतुने श्रीमंत नानासाहेब पेशवे, व इतर संस्थानीकांनी देशभर प्रवास केला. गावोगावी चौकीदार, साधुसंत, फकीर यांनी संदेश पसरवला. ठिकठिकाणी शस्त्रास्त्र व दारुगोळ्याची जमवाजमव सुरु झाली.

३१ मे १८५७ स्वातंत्र्यलढ्याचा सार्वत्रिक दिवस ठरला होता. परंतु बराकपुर छावणीत २९ मार्चलाच मंगल पांडेनी काडतुस नाकारुन इंग्रला अधिका-याला ठार केले. लगोलग ठिकठिकाणी उठाव झाले. काही सैनीकांनी दिल्ली काबीज करुन शेवटचा मुघल सम्राट बहादुर शहा जफर यांना गादीवर बसविले.

आग्रा, शहागंज, अलाहाबाद, कानपुर, गोरखपुर, बनारस, जोनपुर, फतेहपुर, बांदा इ. ठिकाणी यशस्वी उठाव झाले. आणि १ जुलै रोजी बिठुरला नानासाहेबांचा राज्याभिषेक झाला. कजारसिंग यांच्या नेतृत्वाखाली खानदेशात मोठा उठाव झाला.

हळुहळु महाराष्ट्र, रोहीलखंड, राजस्थान, माळवा, बुंदेलखंड, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळ्नाडु, केरळ, गोवा, आदी ठिकाणी स्वातंत्र्ययुध्दाचे लोण पसरले. आणि संपुर्ण भारताने इंग्रजांविरुध्द बंड पुकारला, व १८५७ च्या स्वातंत्र्यसमरास सुरुवात झाली. या उठावात हिंदु-मुसलमान एकजुटीने लढले.
१८५७ साली स्वातंत्र्यसमराच्या, पहिल्या लढ्यास सुरुवात झाली. या लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. काहींना हौतात्म्य पत्करावे लागले, तर काहींनी चळवळीत सहभाग घेऊन स्वतःच्या संसारापासून, मुलाबाळांपासून अलिप्त राहावे लागले. या सर्वांच्या बलिदानातुन आपल्याला स्वतंत्र भारत देश मिळाला. या सर्व योध्यांना माझा शतश: प्रणाम. काळ बदलत असताना स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व लहान-थोर व्यक्तींचे योगदान नव्या पिढीला कळावे, या उद्देशाने माझ्या ब्लॉगचा हा छोटासा प्रयत्न.

या ब्लागवर आपणास १८५७ च्या स्वातंत्रसमरातील विविध संकेतस्थळांनवरुन गोळा केलेली दुर्मिळ चित्र व संक्षिप्त माहीती पाहावयास मिळेल. त्यात १८५७ च्या समराला सुरुवात करणारे विवादीत काडतुस, पी-५३ रायफल, मंगल पांडेंच्या फाशीचा हुकुमनामा, झाशीच्या राणीचे पत्र, बहादुर शाह जफर यांची हस्तलिखीत कविता, बख्तखान यांचा जाहीरनामा, समरातील काही आठवणी - क्रुरपणे दिली जाणारी फाशी, काश्मिरगेट वरील रणसंग्रांम (दिल्ली), बराखपुर येथील छावणी, शिपायांची कैद, तोफेच्या तोंडी सैनिक, लखनव येथील इंग्रजावर हल्ला, इंग्रज अधिकारी हॅवलॉक यांनी केलेली कत्तल, मंगल पांडे, तात्या टोपे, बहादुरशाह जफर, बेगम हज्ररत महल, कुंवरसिंह, नाना साहेब, १८५७ काळातील इंग्रज अधिकारी - ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरीया, गर्व्हर्णल जनरल भारत, हेंन्री हॅवलॉक, झाशीच्या राणीचे पत्र, समरातील योध्यांवरील टपाल टिकीटे, ब्रिटीशांची शौर्य पद्क, १८५७ काळातील महत्वपुर्ण नकाशे , १८५७ च्या कालखंडातील चलन, १८५७ सालातील घटनाक्रम इ.

जय हिन्द
जय भारत

वंन्दे मातरम्

सुचना:
सदर माहीती व चित्र विविध संकेतस्थळांनवरुन गोळा केलेली आहे. तसेच ही माहीती इंग्रजीतुन मराठीमध्ये अनुवादीत केली असल्याने काही त्रुटी व तफावत असण्याची शक्यता आहे.
त्याबद्द्ल क्षमस्व !!


१८५७ सालातील घटनाक्रम

जानेवारी.
काडतुसाचा वाद
फेब्रुवारी
सैनिकांचा बंड - बेहरामपुर आणि बराकपुर
मार्च
मंगल पांडेना फाशी
एप्रिल
अंबाला येथे क्रांती, लखनवच्या ४८व्या तुकडीचा सहभाग
मे
बहादुर शहा जफर यांना दिल्ली येथे राजा म्हणुन घोषीत केले
मे १०
मेरठ छावणीत इंग्रज अधिका-याचा खुन आणि बंडाला सुरुवात
मे ११
युरोपीयनांचा दिल्लीवर हल्ला
मे २३
अग्रा येथे भितीदायक वातावरण
मे ३०
बंडाला सुरुवात - लखनव
मे ३१
भरतपुर सैन्याची बंडाला सुरुवात
जुन ५
घौडद्ळ - २ सैन्याची , बंडाला सुरुवात- कानपुर
जुन ६
कानपुर सैन्याची युध्दाला सुरुवात व अलाहाबाद येथे सैन्याचा इंग्रजांना प्रतिकार
जुन ७
इंग्रज विल्सन व बर्नाड यांची अलीपुर येथे भेट
जुन ८
झाशी येथे युध्दाला सुरुवात "बदले की सिराइ"
जुन ११
लखनव पोलीसांची बंडाला सुरुवात, इंग्रज नेल्स अलाहाबाद येथे आला.
जुन २५
नाना साहेब कानपुर येथे आले
जुन २५
आणि कानपुर बंडाला सुरुवात झाली.
जुन ३०
लखनव युध्दाला सुरुवात
जुलै १
बिठुरला नानासाहेबांचा राज्याभिषेक
इंदोर येथे इंग्रजांविरुध्द बंड
जुलै २
बख्त खान यांचे दिल्लीत आगमन
जुलै ४
इंग्रज हेन्री लोरेंस यांचा म्रूत्यु - लखनव
जुलै ५
इंग्रज जनरल बर्नाड यांचा म्रूत्यु
जुलै ७
इंग्रज हॅवलॉक यांच्या सैन्याची तुकडी कानपुरला रवाना
जुलै १६
नाना साहेबांची पहिल्या कानपुर युध्दासाठी तयारी नव्हती.
ऑगस्ट ५
इंग्रज हॅवलॉक याचा विजय - बशीरतगंज
ऑगस्ट १३
इंग्रज हॅवलॉक कानपुर येथे पोहचला
ऑगस्ट १४
इंग्रज निकोल्सन दिल्ली येथे पोहचला
ऑगस्ट १६
इंग्रज हॅवलॉक याचा विजय - बिठुर
सप्टेंबर ५
इंग्रज सर जेम्स ऑटरम कानपुर येथे पोहचला
सप्टेंबर १४
दिल्लीवर हल्ला
सप्टेंबर १९
इंग्रज हॅवलॉक व जेम्स ऑटरम लखनव येथे पोहचले
सप्टेंबर २०
दिल्ली काबीज केली.
सप्टेंबर २१
इंग्रज विल्यम होडसन यांने राज्याना कैद केले.
सप्टेंबर २२
इंग्रज विल्यम होडसन यांने राजांचा खुन केला.
सप्टेंबर २५
प्रथम विजय लखनवला
ऑक्टॊंबर १०
आग्रा येथील क्रांतीकारकात घबराहट
नोव्होंबर १७
द्वितीय विजय लखनवला
नोव्होंबर १९
स्त्रिया व लहान मुले यांची लखनव येथुन सुटका
नोव्होंबर २२
इंग्रज लखनव येथुन निघाले.
नोव्होंबर २४
इंग्रज हॅवलॉक याचा म्रूत्यु
डिसेंबर ६
तात्या टोपे यांची कानपुर युध्दास तयारी नव्हती.
http://en.wikipedia.org/wiki/Timeline_of_the_Indian_Rebellion_of_1857

analytics

..

१८५७ हा भारतीय उठावर्कत्यांचा लष्करी पराभव असला तरीही मातृभूमीविषयीचे त्यांचे प्रगाढ प्रेम, स्वाभिमान, पराकम आणि हौतात्म्य यामुळे भारतीय जनमानसात त्यांना आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. अगदी मंगल पांडेपासून ते बहादूरशहा जफर, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, अझिमुल्ला, राणी लक्ष्मीबाई, कुवरसिंह अशी ही न संपणारी मोठी यादीच आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनक्रम

जन्म-शके १८०५ वैशाख कृ ६ ||निर्वाण- शके १८८७ फाल्गून शु.६)

१८८३ मे २८ - जन्म भगूर गाव(जि. नाशिक).
१८९२ - आईचे निधन.
१८९८ मे - देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ.
१८९९ सप्टें ५ – वडिलांचे निधन.
१९०० जाने १ -मित्रमेळ्याची स्थापना.
१९०१ मार्च - विवाह.
१९०१ डिसे.१९ - मैट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
१९०१ जाने.२४ - पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश.
१९०४ मे. - अभिनव भारत या आंतरराष्ट्रीय क्रांतीसंस्थेची स्थापना.
१९०५ दसरा - विदेशी कपडयांची होळी.
१९०५ डिसे.२१ - बी.ए. परीक्षा उत्तीर्ण.
१९०६ जून ९ - लंडनला प्रयाण.
१९०७ मे १० - १८५७ च्या स्वातंत्र-युद्धाचा लंडनमध्ये सुवर्ण महोत्सव.
१९०७ जून - मॅझिनीचे चरित्र प्रसिद्ध केले.
१९०८ मे २ - लंडनमध्ये प्रथम शिवजयंत्युत्सव.
१९०८ - हॉलंडमधे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर(इंग्रजी) गुप्तपणे छापले.
१९०९ मे - बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण,पण पदवीस नकार.
१९०९ जून - वडील बंधु श्री.बाबाराव यांना जन्मठेप-काळेपाणी-शिक्षा.
१९०९ जुलै – धिंग्रा यांच्याकडून कर्झन वायलीचा वध.
१९०९ आक्टो.२४ - लंडनमधे दसर्‍याचा उत्सव, अध्यक्ष--- बॅ.गांधी.
१९१० मार्च १३ - पॅरिसहून लंडनला येताच अटक.
१९१० जुलै ८ -मार्सेलिस बंदरात समुद्रात उडी.
१९१० डिसे.२४ - जन्मठेप काळ्यापाणीची शिक्षा.
१९११ जाने.३१ - दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा.
१९११ जुलै ४ - अंदमानच्या कारावासास(एकलकोंडीत) प्रारंभ.
१९१९ एप्रिल - (बाबारावांच्या पत्नी)सौ.येसुवहिनींचे निधन.
१९२० नोव्हें. - धाकचे बंधू डा. नारायणरावांची अंदमान-कारागृहात जाऊन भेट.
१९२१ मे.२ - बाबाराव आणि तात्याराव दोघांची अंदमानातून हिंदुस्थानांत पाठवणी.
१९२१ नि १९२२ - अलिपूर(बंगाल) नि रत्नागिरी येथील बंदिवास.
१९२३ - मुंबईचे राज्यपाल लाईड जार्ज यांची सावरकरांच्या मुक्ततेविषयी चर्चा.
१९२४ जाने.६ - राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यात. राहणे या दोन अटींवर येरवडा कारागृहातून सुटका.
१९२५ जाने.७ - कन्या “ प्रभात ”हिचा जन्म.
१९२६ जाने.१० - हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ‘श्रद्धानंद’साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
१९२७ मार्च १ - रत्नागिरीस गांधीजी-सावरकर भेट आणि चर्चा.
१९२७ मार्च १७ - पुत्र “ विश्वास ”याचा जन्म.
१९३० नोव्हें १६ -रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन
१९३१ फेब्रु.२२ -पतित-पावन मंदिरात श्री. लक्ष्मी-नारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.
१९३१ फेब्रु २५ - मुंबई इलाखा अस्पृश्यता-निवारक-परिषद अधिवेशन ६ वे अध्यक्ष.
१९३१ एप्रिल २६ -सोमवंशी महार-परिषद- अध्यक्ष. पतित-पावन मंदिरात सभा.
१९३१ सप्टें २२ -नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी भेट दिली.
१९३१ सप्टें १७ -श्रीगणेशोत्सवात भंगीबुवांचे कीर्तन.महाराचा गीतापाठ
आणि ७५ स्पृश्या- स्पृश्य महिलांचे पहिले सहभोजन.
१९३७ मे १० -रत्नागिरी स्थलबद्धतेतून विनाअट संपूर्ण मुक्तता.
१९३७ डिसे.३० -हिंदुमहासभा १९ व्या अ. भा. अधिवेशनाचे अध्यक्ष,कर्णावती.लागोपाठ सात वर्षे अ.भा.हि.म. सभेच्या अध्यक्षपदीं निवड.
१९३८ एप्रिल १५ - ‘ महाराष्ट्र-साहित्य-संमेलन ’ २२ वे अधिवेशन,मुंबई, अध्यक्ष.
१९३९ फेब्रु १ -निजाम विरोधी ‘भागानगरचा निःशस्त्र प्रतिकार’प्रारंभ.
१९४१ जून २२ -सुभाषचंद्र बोस अवचित सावरकर-सदनात येऊन भेटले.
१९४१ डिसे.२५ -भागलपूरचा नागरिक-सभा-स्वातंत्र्यार्थ लढा.
१९४३ मे २८- ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अ.भा. सत्कार आणि निधी समर्पण.
१९४३ आगस्ट- १४ नागपूर-विद्यापीठाने डी. लिट. ही सन्मान्य पदवी दिली.
१९४३ नोव्हें ५- अखिल महाराष्ट्र नाट्य-संमेलन अध्यक्ष.
१९४५ मार्च १६ -वडील बंधु श्री.गणेशपंत(तथा बाबाराव) यांचे निधन, सांगली.
१९४५ एप्रिल १९ -अ.भा. संस्थान-हिंदूसभा-अधिवेशन(बडोदे) अध्यक्ष.
१९४५ मे ८ -कन्या ‘ प्रभात ’ चा विवाह, पुणे.
१९४६ एप्रिल -मुंबई सरकारनं संपूर्ण सावरकर-वाङमयावरील बंदी उठवली.
१९४७ आगस्ट- १५ दुख:मिश्रित आनंद! घरावर भगवा ध्वज नि राष्ट्र- ध्वज उभारले.
१९४८ फेब्रु. -५ गांधी-वधानंतर सुरक्षा-निर्बंधान्वये अटक.
१९४९ फेब्रु १० -गांधीहत्या अभियोगातून निष्कलंक सुटका.
१९४९ आक्टो १९ - धाकटे बंधू डा. नारायणराव यांचे निधन.
१९४९ डिसे. - अ.भा.हि.म. सभा, कलकत्ता- अधिवेशनाचे उद्- घाटक.
१९५० एप्रिल ४ - पाक पंतप्रधान लियाकत अली ची दिल्ली भेट म्हणून अटक नि बेळगाव कारागृह-वास.
१९५२ मे १०-१२ - ‘ अभिनव-भारत ’संस्थेचा सांगता-समारंभ, पुणे.
१९५५ फेब्रु.- रत्नागिरीच्या पतित-पावन मंदिराच्या सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष.
१९५६ जुलै २३ -लो.टिळक जन्मशताब्दी महोत्सव,पुण्यात भाषण.
१९५६ नोव्हें १० - अ.भा.हि.म. सभा,जोधपूर- अधिवेशनाचे उद्-घाटक.
१९५७ मे १० - दिल्लीत १८५७ च्या स्वातंत्र्युद्ध-शताब्दी महोत्सवात भाषण.
१९५८ मे २८ - ७५ वा वाढदिवस. मुंबई महापालिकेकडून सत्कार.
१९५९ आक्टो ८ - पुणे विद्यापीठाने ‘डी-लिट ’ सन्मान्य पदवी(घरी येऊन) दिली.
१९६० डिसें. २४ - मृत्युंजय-दिन-साजरा(या दिवशी ५०वर्षे जन्मठेप संपत होती).
१९६१ जाने.१४ - मृत्युंजय-दिनानिमित्त शेवटचे प्रकट भाषण(पुणे).
१९६२ एप्रिल १५ - मुंबईचे राज्यपाल श्रीप्रकाश घरी येऊन भेटले.
१९६३ मे २९ - मांडीचे हाड मोडल्याने रूग्णालयात.( मुंबई)
१९६३ नोव्हें ८ - पत्नी सौ. यमुनाबाई यांचे निधन.
१९६४ आगस्ट १ - मृत्युपत्र केले.
१९६४ आक्टो. - भारत सरकारकडून मासिक रू.३०० मानधन देऊन सन्मान.
१९६५ सप्टें - गंभीर आजार.
१९६६ फेब्रु १ - अन्न आणि औषध वर्ज्य करून प्रायोपवेशनास प्रारंभ.
१९६६ फेब्रु २६ - शनिवारी सकाळी १०-३० वाजता देह-विसर्जन. वय८३
१९६६ फेब्रु २७ -महायात्रेत मुंबई सेंट्रल स्थानकासमोर रा.स्व. संघाची सैनिकी मानवंदना, मुंबईच्या चंदनवाडी विद्युत्-दाहिनीत अग्निसंस्कार....
(सावरकर डॉट ऑर्ग वरुन साभार)